मुंबई

दादर-रत्नागिरी पॅसेंजर तातडीने सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

CD

दादर-रत्नागिरी पॅसेंजर तातडीने सुरू करा अन्यथा आंदोलन
मनसेचा मध्य रेल्वेला निवेदनाद्वारे इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २४) मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दादर-रत्नागिरी रेल्वे पॅसेंजर सेवा रद्द करून तिच्याऐवजी दादर-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. या निर्णयाची रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे मध्य रेल्वेला दिला आहे.
महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच आता पुन्हा दादर- रत्नागिरी गाडी रद्द करण्यात आली असून, त्याजागी दादर-गोरखपूर गाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने कोकणात प्रवास करणाऱ्या मुंबईकर व कोकणवासीयांची फार मोठी गैरसोय होणार आहे. कोकणवासीयांना व महाराष्ट्रातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात असून, त्याचा आम्ही निषेध करतो, असे मनसेने मध्य रेल्वेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत दादर स्थानकातून सोडण्यात यावी तसेच याआधी रद्द केलेल्या इतरही गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अन्यथा स्थानिक जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. कृपया रेल्वे प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारादेखील मनसेने मध्य रेल्वेला निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्रातील या अंतर्गत गाड्या बंद
मागील काही काळापासून महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वेगाड्या रद्द करून परराज्यातील गाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. कोविड काळात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्स्प्रेस यासारख्या असंख्य रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्या नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT