Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Shresta Iyer Slams Trolls Over Viral KKR Video: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू असताना पंजाब किंग्सच्या एका सामन्यानंतर श्रेयस अय्यरच्या बहिणीने एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यावर तिला मोठ्याप्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावर आता तिने मौन सोडले आहे.
Shresta Iyer Slams Trolls Over Viral KKR Video

Shresta Iyer Slams Trolls Over Viral KKR Video

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची (IPL 2026) रोमांचक साखळी फेरी अखेर रविवारी (२४ मे) संपली. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी प्लेऑफमधील चौथा संघ निश्चित झाला. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर ३० धावांनी पराभूत केले आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवली.

अखेरच्या दिवसापर्यंत प्लेऑफमधील शेवटच्या जागेसाठी राजस्थान, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स शर्यतीत होते. परंतु, राजस्थानने मुंबईला हरवल्याने पंजाब किंग्ससह (Punjab Kings) कोलकाताचेही आव्हान संपले. विशेष म्हणजे पहिल्या ७ सामन्यांमध्ये ६ विजय मिळवूनही नंतर सलग ६ सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने पंजाबवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली.

यादरम्यानच आता पंजाब किंग्स स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) धाकटी बहीण श्रेष्ठा अय्यर (Shresta Iyer) हिने तिला सहन करावा लागलेल्या ट्रोलिंगवर (Trolling) अखेर मौन सोडले आहे.

Shresta Iyer Slams Trolls Over Viral KKR Video
IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com