मुंबई

उडान महाराष्ट्र २०२६’ चे उत्साहात आयोजन प्रारंभिक बालपण देखभाल आणि शिक्षणाचा पाया मजबूत करण्यावर भर

CD

‘उडान महाराष्ट्र २०२६’ उत्साहात
परिषदेत बालपण देखभाल व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : ‘उडान महाराष्ट्र २०२६’ ही राज्यस्तरीय परिषद नुकतीच मुंबईतील यशस्वंतराव चव्हाण सेंटर येथे उत्साहात पार पडली. राज्यातील प्रारंभिक बालपण देखभाल आणि शिक्षण व्यवस्था (ईसीसीई) अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत विविध घटकांमध्ये प्रभावी समन्वय साधला गेला.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे आणि प्रारंभिक बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या रॉकेट लर्निंग या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी धोरणकर्ते, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्री तटकरे यांनी आपल्या बीजभाषणात राज्यातील ईसीसीई प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासनातील समन्वय आणि यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर दिला. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांनीही परिषदेत मार्गदर्शन करताना फ्रंटलाइन यंत्रणा सशक्त करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

रॉकेट लर्निंगचे सह-संस्थापक सिद्धांत सचदेव यांनी तंत्रज्ञान आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम साधण्याबाबत संस्थेची वचनबद्धता व्यक्त केली. आयसीडीएससोबतची भागीदारी राज्यातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि इतर संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. या सहभागातून राज्यातील बालशिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित झाली.

परिषदेदरम्यान ईसीसीई परिसंस्थेतील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ‘फाउंडेशन फर्स्ट : द गोल्डन १००० डेज मिशन’ या सत्रात बालविकासातील पहिल्या हजार दिवसांचे महत्त्व आणि एकात्मिक हस्तक्षेपाची गरज स्पष्ट करण्यात आली. याचवेळी ‘महाराष्ट्र दिव्यांग नियमावली’चे अनावरण करण्यात आले, जे बालपण प्रणाली अधिक समावेशक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

‘धोरणापासून ते अंमलबजावणीपर्यंत : राज्यामधील ईसीसीई सर्वोत्तम पद्धती’ या सत्रात यशस्वी मॉडेल्स सादर करण्यात आली. ‘एआयसह प्रभावाचा विस्तार’ या सत्रात अंगणवाडी प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात आला. परिषदेचा समारोप ‘प्रभावासाठी सहयोगी मॉडेल्स’ या विषयावरील चर्चेने झाला. यात सरकारी धोरणे आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी यांच्यातील समन्वयातून शाश्वत आणि व्यापक बदल घडवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT