महिला डॉक्टरला शिवीगाळ
मुंबई, ता. २५ : कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या दोन तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मार्चला अफझल शेख नावाचा तरुण डोक्याला मार बसल्याची तक्रार घेऊन अपघात विभागात उपचारासाठी आला. तेव्हा डॉ. अनुजा करवा रुग्णांना तपासत होत्या. शेखची जखम किरकोळ असल्याने त्यांनी त्यास काही काळ थांबण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने आपल्या मित्राला बोलावून अपघात विभागात गोंधळ घातला. डॉ. अनुजा यांना धमकावले, शिवीगाळ केली. आरोपी आक्रमक होत असल्याचे पाहून डॉ. अनुजा यांनी पोलिसांना मदतीसाठी बोलावून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.