रिलायन्स टेलिकॉमसह माजी संचालकांवर छापे
मुंबई, ता. २६ ः केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज रिलायन्स टेलिकॉम कंपनीचे कार्यालय आणि दोन माजी संचालकांच्या निवासस्थानी छापे घातले.
स्टेट बँकेने केलेल्या तक्रारी आधारे अलीकडेच सीबीआयने रिलायन्स टेलिकॉम कंपनी, माजी संचालक सतीश सेठ, गौतम दोषी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी छापे घातल्याचे सीबीआय प्रवक्त्याने स्पष्ट केले. या कारवाईत तपासाशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात आले. एसबीआयच्या तक्रारीनुसार, रिलायन्स टेलिकॉम कंपनीने बँकेकडून ११४ कोटींचे कर्ज घेत गैरव्यवहार केले. कर्ज थकवल्याने बँकेला तेवढ्या रकमेचा तोटा सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.