फंड्स इंडियाची मालमत्ता २५ हजार कोटींपुढे
मुंबई, ता. २७ : फंड्स इंडियाने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा २५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, केवळ एका तिमाहीपेक्षा थोड्या जास्त कलावधीत २० हजार कोटी रुपयांवरून २५ हजार कोटींपर्यंत म्हणजे २५ टक्के वाढ नोंदविली आहे.
२५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ध्यानात घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५८ टक्के आणि मागील तीन वर्षांमध्ये ३८ टक्के चक्रवाढ दराने वाढ नोंदवली आहे. मागील वर्षभरात कंपनीकडे २,१०० कोटींचा निधी आला, तर मागील दोन वर्षांत २,९०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी ७७ टक्के वाटा छोट्या गुंतवणूकदारांचा आहे, तर बड्या आणि अतिश्रीमंत गटातील गुंतवणूकदारांचा वाटा २३ टक्के आहे. त्यामुळे कंपनीला संतुलित आणि सक्षम मालमत्तेचा पाया मिळाल्याचे मानले जात आहे. ही कंपनी देशभरातील सुमारे ३० लाख वापरकर्त्यांना सेवा देत आहे. हे वापरकर्ते केवळ मोठ्या शहरांमधील नसून, ते देशातच्या सर्व श्रेणींमधील शहरातील रहिवासी आहेत. कंपनीचे एसआयपी १४२ कोटी रुपये असून, त्यात दरमहा दोन कोटींची वाढ होत आहे, असे फंड्स इंडियाचे ग्रुप सीईओ अक्षय सप्रू म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.