मुंबई

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत १२ आपत्कालीन ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी

CD

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत
सायन रुग्णालयातील दुसऱ्या टप्प्याच्या पुनर्विकासाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : सायन रुग्णालयाचा दोन टप्प्यात पुनर्विकास होत आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत, दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा नुकताच लोकमान्य टिळक रुग्णालय येथे झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा उत्साहात झाला.

दुसऱ्या टप्प्यातील इमारतीत कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत, १२ आपत्कालीन ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, तीन हजारांहून अधिक बेड्स, नमुने जलदगतीने पाठवता यावे, यासाठी प्रथमच न्यूगमॅटिक शूट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या असंख्य रुग्णांना अत्यंत माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येतात. यासाठी रुग्णालयांमध्ये सातत्याने अद्ययावत सेवासुविधा पुरविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचाही दोन टप्प्यांत पुनर्विकास करण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यांत रुग्णालयाची मुख्य इमारत, ऑनकॉलॉजी, आपत्कालीन विभाग व बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन हजार २८६ इतकी रुग्णशय्या क्षमता उपलब्ध होणार आहेत. दुसरा टप्पा २ (अ)अंतर्गत एकूण १५ मजल्यांच्या नूतन इमारतीमध्ये दोन हजार २०० रुग्णशय्या असणार आहेत. येथील विविध कक्षांमध्ये प्रामुख्याने स्थिर रुग्ण ठेवले जातील. तसेच मध्यवर्ती नोंदणीकरण (रजिस्ट्रेशन), अतिदक्षता विभागासाठी इमारतीतील संपूर्ण एक मजला राखीव ठेवण्यात येणार आहे.

क्ष किरण, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय या सुविधादेखील या इमारतीमध्येच उपलब्ध होणार आहेत. इमारतीमध्ये २४ तास कार्यान्वित असणाऱ्या १२ आपत्कालीन शस्त्रक्रियागृह (ऑपरेशन थिएटर) संख्या वाढवून ती २४ करण्यात आली आहे. एकाच छताखाली अतिविशेष सेवा गरजू रुग्णांच्या मदतीसाठी समाज वैद्यकीय अधिकारी, महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना, अत्याधुनिक मध्य‍वर्ती प्रयोगशाळा, विकेंद्रीत रेडिओलॉजी सुविधा (एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे, डेक्सा स्कॅन, कॅथलॅब, फार्मसी, सुसज्ज व मोठे सर्वसाधारण कक्ष), अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहे (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स), रुग्ण आहारगृह, नातेवाइकांसाठी उपाहारगृह आणि सुसज्ज प्रतीक्षाकक्ष उभारण्यात येणार आहे.
--------
१३ मजली स्वतंत्र इमारत
कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरातून मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईमध्ये येतात. शिवाय, ही उपचार प्रक्रिया अत्यंत खर्चिक व दीर्घकालीन असते. यामुळे कर्करोगाच्या‍ सर्वसमावेशक उपचारासाठी लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय परिसरात १३ मजली एक स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत २०० रुग्णशय्या असतील. तसेच अत्याधुनिक रेडिओथेरपी युनिट्स (लिनिअर ॲक्सिलरेटरसह), केमोथेरपीसाठी विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी विभाग उभारण्यात येणार आहेत.
--
अल्पदरात उपचार
त्याबरोबरच पेट स्कॅन, एमआरआय, सीटीस्कॅन अशा अत्याधुनिक मशीनद्वारे निदान सुविधा, ब्रॅकीथेरपी, रेडिओथेरपी, केमोथेरपीसारख्या सेवा पुरविण्यात येतील. कर्करुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना अंतर्गत मोफत/महापालिकेने ठरवून दिलेल्या अल्पदरात उपचार करण्यात येतील. तसेच न्युमॅटिक शुट्सद्वारे सॅम्पल कलेक्शन सुविधाही उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT