लोकलवर दगडफेक; महिला जखमी
मुंबई, ता. २७ : सीएसएमटीहून बदलापूरकडे जाणाऱ्या संध्याकाळी ७.१४ वाजताच्या जलद लोकलवर दादर स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत महिला डब्यातील एका प्रवासी महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दादर स्थानकाच्या अगोदर सिग्नलमुळे काही क्षण ही लोकल थांबली असताना रेल्वेमार्गाच्या डाव्या बाजूकडून अज्ञात व्यक्तीने मोठा दगड महिला डब्याकडे फेकला. हा दगड एका महिलेच्या डोळ्याला लागल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर सहप्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी महिलेला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका (सायन) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रेल्वे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.