आरोग्य क्षेत्राचा जागतिक केंद्राकडे प्रवास
मुंबई, ता. २७ : ‘पल्स २०२६’ या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एकात्मिक आरोग्यसेवा आणि पुनर्वसनासाठी जागतिक केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, की राज्यात आरोग्य क्षेत्राला केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नव्हे; तर नवोन्मेष, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जात आहे. २०४७च्या दृष्टिकोनानुसार आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक आरोग्यव्यवस्था उभारण्यावर सरकारचा भर आहे. पुढे त्यांनी सांगितेली, की प्रत्येक नागरिकाला घरापासून पाच ते आठ किलोमीटरच्या परिसरात परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण मजबूत करणे, पदव्युत्तर जागा वाढवणे, आरोग्यसेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे आणि कर्करोग उपचारासाठी तीनस्तरीय मॉडेल विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. ही परिषद राज्यातील आरोग्य क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा ठरवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.