आयपीएलसाठी वाहतुकीत बदल
पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यामुळे मुंबई ट्राफिक पोलिसांनी दक्षिण मुंबईसाठी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस रोड आणि कोस्टल रोड काही ठिकाणी आज सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. यापुढेही होणाऱ्या सामान्यांनाही हे वाहतूक बदल लागू असणार आहेत.
स्टेडियम परिसरात पार्किंगला बंदी असून, अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मरीन ड्राइव्ह परिसरात होणारी संभाव्य गर्दी पाहता पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. स्टेडियम परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने चाहत्यांनी लोकल ट्रेन किंवा मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त प्रशांत परदेशी यांनी केले आहे. १२, १६, २३, २९ एप्रिल आणि ४, २४ मे रोजी वानखेडे सामने होणार आहेत.
...
बदल असे
१. नेताजी सुभाषचंद्र बोस रोड उत्तर वाहिनी एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शनपर्यंत आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
पर्यायी मार्ग- रामनाथ पोद्दार चौक (गोदरेज जंक्शन) महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाइन्स-चर्नी रोड स्टेशन- पंडित पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) - पुढे इच्छितस्थळी जातील.
२. नेताजी सुभाषचंद्र बोस रोड (दक्षिण वाहिनी) प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते एअर इंडिया जंक्शनपर्यंत आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
पर्यायी मार्ग - पंडित पलुस्कर चौक (ऑपेरा हाउस जंक्शन) - चर्नी रोड स्टेशन मरीन लाइन्स महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) रामनाथ पोद्दार चौक (गोदरेज जंक्शन) पुढे इच्छितस्थळी जातील.
३. कोस्टल रोड (दक्षिण वाहिनी) वरळी, ताडदेव ते मरीन ड्राइव्हकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
पर्यायी मार्ग - हाजी अली जंक्शन पेडर रोड-पंडित पलुस्कर चौक (ऑपेरा हाउस जंक्शन) महर्षी कर्वे रोड मरीन लाइन्स चर्चगेट जंक्शन-रामनाथ पोद्दार चौक (गोदरेज जंक्शन) पुढे इच्छितस्थळी जातील.
४. कोस्टल रोड (उत्तर वाहिनी) मरीन ड्राइव्ह ते वरळी, ताडदेव दिशने जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
पर्यायी मार्ग - रामनाथ पोद्दार चौक (गोदरेज जंक्शन महर्षी कर्वे रोडने अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) मरीन लाइन्स-चर्नी रोड स्टेशन- पंडित पलुस्कर चौक (ऑपेरा हाउस जंक्शन) पेडर रोड हाजी अली जंक्शनपुढे इच्छितस्थळी जातील.