मुंबई

अडगळीतील भूखंड म्हाडा विक्री करणार

CD

अडगळीतील भूखंड म्हाडा विक्री करणार
अंबरनाथमधील पाच भूखंड अजेंड्यावर; ना पायाभूत सुविधा, ना कनेक्टिव्हिटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : पायाभूत सुविधांचा अभाव आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अडगळीत नसलेले भूखंड म्हाडा विक्री करणार आहे. त्यानुसार अंबरनाथमधील पाच भूखंड म्हाडाच्या अजेंड्यावर असून, त्या ठिकाणी घरांची उभारणी केली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सदरचे भूखंड विक्री करून महसूल उभा करण्याचा म्हाडाच्या कोकण मंडळाचा विचार आहे. त्यानुसार लवकरच त्या पाच भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा काढल्या जाणार आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाचे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, खोणी, शिरढोण अशा वेगवेगळ्या ठिकाणी भूखंड असून, त्यावर परवडणारी घरे उभारून त्याची लॉटरीद्वारे विक्री केली जाते. मात्र, अनेक ठिकाणचे भूखंड रेल्वे स्थानक किंवा मूळ शहरापासून दूर असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी घरे उभरल्या त्याला फारशी मागणी नसते. म्हाडाचे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन-अडीच किलोमीटर अंतरावर ८००-१००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड आहेत. त्यामुळे म्हाडाने त्या ठिकाणी घरे न बांधता भूखंडाची विक्री करण्याचा म्हाडाचा विचार असल्याचे कोकण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे किमती आवाक्याबाहेर
पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी केवळ म्हाडाची जमीन आहे म्हणून गृह प्रकल्प उभारताना तेथे रस्ते, पाणी, सांडपाणी अशा वेगवेगळ्या सुविधा स्वखर्चाने निर्माण कराव्या लागतात. त्यामुळे त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर जातात. परिणामी सर्वसामान्यांकडून म्हाडाची घरे महागडी असल्याची ओरड होते. त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर गृह प्रकल्प राबवण्याचा नाद तूर्तास म्हाडाने सोडल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT