मुंबई

मुंबई विद्यापीठात ‘फुलब्राइट-नेहरू’ फेलोशिपवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन

CD

मुंबई विद्यापीठात ‘फुलब्राइट-नेहरू’ फेलोशिपवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन
पूर्ण अर्थसहाय्यित शिष्यवृत्ती, जागतिक अनुभव आणि करिअरला नवी उंची देणारी संधी
मुंबई, ता. ३१ : विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या क्षेत्रांमध्ये शिक्षण, संशोधन आणि करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अमेरिकेत उच्च शिक्षण, संशोधन व अध्यापनाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठात फुलब्राइट-नेहरू फेलोशिप २०२७-२०२८ या विषयावर विशेष जागरूकता आणि मार्गदर्शन सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्र आणि युनाइटेड स्टेट्स- इंडिया एजुकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गुरुवारी (ता. २) दुपारी ३.३० वाजता विद्यानगरी, कलिना येथील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये होणार आहे.
फुलब्राइट-नेहरू शिष्यवृत्ती ही फुलब्राइट प्रोग्राम अंतर्गत दिली जाणारी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित फेलोशिप असून, भारत-अमेरिका शैक्षणिक सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण दुवा मानली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्ण अर्थसहाय्यित शिक्षण, संशोधनाची संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळतो.
या कार्यक्रमात युनाइटेड स्टेट्स-इंडिया एजुकेशनल फाउंडेशनचे प्रादेशिक अधिकारी डॉ. रायन परेरा यांच्याकडून फेलोशिपचा सविस्तर आढावा, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रभावी अर्ज कसा तयार करावा, मुलाखतीची तयारी कशी करावी याबाबतही ते मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई विद्यापीठातील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मागील चार वर्षांत पीएच.डी. पूर्ण केलेले संशोधक, तसेच अमेरिकेत अध्यापन व संशोधनासाठी इच्छुक प्राध्यापक आणि संशोधक यांना या कार्यक्रमाचा विशेष लाभ होणार आहे.
या विशेष मार्गदर्शन सत्रात उपस्थित राहण्यासाठी नोंदणी विनामूल्य असून, जागा मर्यादित (३००) आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून, सहभागींनी आधार कार्ड व संस्थेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संधींची दिशा मिळेल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ (मो. क्र. ८३६९७५३६४२ / ई-मेल : dsd@mu.ac.in) येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT