मुंबई

सायन रुग्णालयातील ओपीडी इमारतीला आग

CD

सायन रुग्णालयातील ओपीडी इमारतीला आग
सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ३१ : सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने वेळीच रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या सुलोचना शेट्टी मार्गावरील ओपीडी इमारतीत आज सकाळी ११:५७च्या वाजता आग लागल्याचा कॉल आला. ही आग पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘बीपीएमएस’ लेक्चर रूममध्ये लागली होती. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी १२:१४ वाजता आग ‘लेव्हल-१’ची असल्याचे घोषित केले. आग प्रामुख्याने इलेक्ट्रिक वायरिंग, स्प्लिट एसी युनिट, लाकडी फर्निचर, कार्यालयातील कागदपत्रे आणि फॉल्स सीलिंगपर्यंत मर्यादित होती. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ओपीडीमधील रुग्ण आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना तातडीने दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले. दुपारी १:०९ वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि वॉर्ड स्टाफ घटनास्थळी दाखल झाले होते. सायन रुग्णालयाचे उप-अधिष्ठाता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग आता पूर्णपणे विझली असून, कूलिंग ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. ​आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT