दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांना निवेदन
मुंबई, ता. ३१ : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे पुन्हा दादर स्थानकापर्यंत सुरू करावी, अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तसेच शक्य असल्यास या गाडीचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. कोविड काळानंतर या गाडीची सेवा दादरऐवजी दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त असलेल्या कोकणातील प्रवाशांना अतिरिक्त लोकल प्रवास करावा लागत असून, वेळ आणि खर्च वाढत असल्याची बाब वायकर यांनी निवेदनात नमूद केली आहे. यासंदर्भात १० जानेवारी २०२५ रोजीसुद्धा रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिल्याचे वायकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.