मुंबई

जैन मंदिरात १.७५ कोटींची चोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकास अटक

CD

जैन मंदिरात १.७५ कोटींची चोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकास अटक
४८ तासांत काळाचौकी पोलिसांची कारवाई; मध्य प्रदेशात १७ गुन्हे नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः लालबागच्या अविघ्न पार्क संकुलातील जैन मंदिरात पावणे दोन कोटींचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास काळाचौकी पोलिसांनी ४८ तासांच्या आत मध्य प्रदेशातून अटक केली. चोरी झालेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
जितेंद्र नागाईच (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात मध्य प्रदेश राज्यात चोरी, लूटमार, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे असे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वीच तो यातील एका गुन्ह्यातून जामिनावर मुक्त झाला होता.
विशेष म्हणजे इतकी मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही मिरा रोड येथील सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीमार्फत महिनाभरपूर्वी आरोपी जितेंद्र याला अविघ्न पार्क संकुलात सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या संकुलात मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ ट्रस्टचे मंदिर आहे. त्यातील भागवान सिमंदर यांच्या संगमरवरी मूर्तीवर पावणे दोन कोटींचे सोन्याचे, हिरेजडित दागिने होते. ते आरोपीने हेरले. ३० मार्चच्या मध्यरात्री ३च्या सुमारास त्याने मंदिराचा कडीकोयंडा तोडून दागिने चोरले आणि पसार झाला.
ही चोरी पहाटे मंदिर उघडणाऱ्या पुजाऱ्याच्या लक्षात आली. त्याने काळाचौकी पोलिसांना कळवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस उपआयुक्त आर. रागसुधा यांनी तातडीने चार ते पाच विशेष पथके तयार केली. परिसरातील सुमारे ३०० सीसीटीव्हींचे चित्रण पाहिल्यावर जितेंद्रची ओळख पटली.
जितेंद्र मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. दरम्यान, त्याच्या मोबाईल क्रमांकावरून तो मध्य प्रदेश येथे रवाना झाल्याचे समजले. उपआयुक्त रागसुधा यांनी दोन पथके त्वरित मध्य प्रदेशसाठी रवाना केली. दरम्यान, आरोपीचा नेमका ठावठिकाणा शोधणाऱ्या पथकास जितेंद्र एका नातेवाइकाच्या घरी दडल्याचे समजले. पोलिसांनी तेथे छापा घालून त्याला अटक केली.

उर्फ नावामुळे अभिलेख दडला
आरोपी जितेंद्रविरोधात मध्य प्रदेशात १७ गुन्हे नोंद आहेत. मात्र, त्या सर्वांत त्याचे जीतन, बंटी, पंडित या उर्फ नावांवर नोंद आहेत. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या मूळ नावाने अभिलेख तपासला असता त्याच्याविरोधात असलेल्या गुन्ह्याची माहिती पुढे आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open 2026: २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष! २ तास ५१ मिनिटांच्या थरारात कसाबसा मिळवला विजय!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २६ मे २०२६

ढिंग टांग : मार्को रुबियो रिपोर्ट..!

जीवनमान-जीवनभान : संजीवनी देणारी ‘सीपीआर’ पद्धत

RCB vs GT Qualifier 1: RCB सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाणार? गुजरात टायटन्सशी आज ‘क्वालिफायर वन’ लढत धरमशालामध्ये रंगणार

SCROLL FOR NEXT