मुंबई

युद्धाचा पर्यटनाला फटका

CD

युद्धाचा पर्यटनाला फटका
मध्य पूर्व आशियातील पर्यटकांमध्ये घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : अमेरिका-इराण युद्धाने जगभरातील पर्यटन उद्योगावर प्रचंड संकट कोसळले आहे. विशेषतः भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या पर्यटन बाजारपट्ट्यातील हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सी आणि विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे आखाती मार्गावरील विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली. त्यामुळे कित्येक प्रवाशांनी आपले सहलीचे नियोजन रद्द करावे लागले.

अमेरिका-इराणमधील तणाव सीमेवर पोहोचल्याने मध्य पूर्वेतील हवाई मार्ग बंद झाले आहेत. भारतात परदेशी पर्यटकांच्या हॉटेल बुकिंगमध्ये घसरण दिसून आहे, तर मार्च-एप्रिल या हंगामात ही आकडेवारी २० टक्क्यांपर्यंत खाली गेली. मुंबई, दिल्ली, बंगळूर, गोवा यांसारख्या गेटवे शहरांना सर्वाधिक नुकसान होत आहे. मुंबईतील ताज, ओबेरॉयसारख्या पंचताराकित हॉटेल्समध्ये मागील महिन्यात रूम रिकाम्या होत्या. सोबतच महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाशी निगडीत ९० ते ९९ टक्के बुकिंग रद्द झाल्या आहेत. ट्रॅव्हल एजन्सींनुसार दुबई, अबूधाबी, शारजाहसारख्या लोकप्रिय स्थळांसाठी राखीव ५० ते ६० टक्के बुकिंग रद्द झाले. आता पर्यटक दुबईऐवजी सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनामकडे वळत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्य पूर्वेच्या फ्लाइट्स ४० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
भारतीय पर्यटकांच्या मध्य पूर्व आणि युरोपच्या बुकिंग १५ ते २० टक्के रद्द झाल्या, तर परदेशी पर्यटकांमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. काही मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांकडून ६० हजारांहून अधिक बुकिंग रद्द करण्याची नोंद करण्यात आली आहे. आखातामधून भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये ५० टक्के घट झाली आहे.
==

मध्य पूर्व आशियातील युद्धाचा पर्यटनाला सर्वाधिक धक्का बसला आहे. कारण आखाती देशामधून येणारे परदेशी पर्यटक पूर्णपणे थांबले आहेत. हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सी, टॅक्सी सर्व्हिसेस आणि मुंबई-गोवा-सिंधुदुर्गासारख्या पर्यटन केंद्रांना कोट्यवधींचे नुकसान होत आहे. परदेशात जाणारे पर्यटक लोणावळा महाबळेश्वरकडे जात आहेत.
- अनिल गर्ग, सदस्य, बसमालक संघटना
===
महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायावर ५० टक्के बुकिंग रद्द झाल्या आहेत. देशात दररोज पाच हजार परदेशी पर्यटक येतात. देशभरात हीच परिस्थिती आहेत. येणाऱ्या पर्यटक संख्येत मोठी घट झाली आहे. दुबईला देशातून दररोज २० हजार लोक जातात त्याची संख्या आता कमी झाली आहे. तिकडे काम करणारे आता परत येत आहेत.
- मलिक पटेल, अध्यक्ष, टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

Multibagger Stocks: 1 लाखाचे 30 लाख! Market Crash असताना या 3 शेअर्सने गुंतवणूकदारांना केल मालामाल

'धुरंधर २' मध्ये फक्त ५ सेकंद दिसली पण पैसे किती मिळाले माहितीयेत? अनेकांचा वर्षाचा पगार नाही तितका

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

SCROLL FOR NEXT