मुंबई

सम्मान

CD

‘सम्मान कॅपिटल’ आता
आयएचसी समूहाची कंपनी

मुंबई, ता. ४ : बहुराष्ट्रीय बिगर बँक वित्तसंस्था असलेली ‘सम्मान कॅपिटल’ ही आता अबुधाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (आयएचसी) पीजेएससीची उपकंपनी झाली आहे. आयएचसीला इक्विटी शेअर आणि वॉरंटच्या प्राधान्य वाटपाद्वारे ४१.५ टक्के हिस्सा मिळाला आहे.
याद्वारे आता आयएचसीला सम्मान कॅपिटलचे प्रवर्तक म्हणून वर्गीकृत केले जाईल. तसेच कंपनीचे धोरणात्मक नियंत्रण आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची सूत्रे आयएचसीकडे सोपवली जाईल, असे सम्मान कॅपिटलतर्फे जाहीर करण्यात आले. आयएचसी ही मध्यपूर्वेतील सर्वाधिक मूल्य असलेली सूचीबद्ध कंपनी असून तिचे बाजारमूल्य अंदाजे २३२ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. तिने सम्मान कॅपिटलला ५,६५२ कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. या वॉरंटचे पूर्ण भरणा झालेल्या इक्विटी शेअरमध्ये रूपांतर झाल्यावर १८ महिन्यात कंपनीला आणखी तीन हजार १९८ कोटी रुपये मिळतील. ओपन ऑफर व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयएचसीकडे सम्मान कॅपिटलचा ६३.३% हिस्सा राहील.
आयएससी ग्रुपला संयुक्त अरब अमिरातीचे ए ए सार्वभौम मानांकन आहे. त्याचा लाभ घेऊन सम्मान कंपनी आपले आंतरराष्ट्रीय मानांकन अधिक बळकट करेल. यानंतर आता ही संयुक्त कंपनी उच्च गुणवत्तेच्या कर्ज खात्यावर काम करेल. आर्थिक वर्ष २०२९पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा विचार करता भारतातील पहिल्या तीन सर्वात मोठ्या बिगरबँक वित्तसंस्था बनण्याचा सम्मान कॅपिटलचा निर्धार आहे. आता कंपनी गहाण कर्जाबरोबरच मध्यम आणि निम्न गटातील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून एमएसएमई कर्जे, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, सोनेतारण कर्ज देईल. या काळात पाच कोटी ग्राहक मिळवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Sankashti Chaturthi : करिअरमधील अडथळे दूर करायचेत? मग आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाला अर्पण करा 'या' ५ गोष्टी; यशाचा मार्ग होईल मोकळा!

Pune News: पुण्यातील अनधिकृत इंटरनेट केबल रडारवर; महापालिकेकडून कारवाई ; ‘वर्क फ्रॉम होम’ला फटका

Gold Silver Price Fall 2026 : सोने ५३ तर चांदी २ लाखांनी स्वस्त, ४ महिन्यात दरात मोठी घसरण; युद्धामुळे दर आणखी उतरणार?

Latest Marathi News Live Update : नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन शस्त्रास्त्र आणि दुर्मिळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन; सुवर्ण होन आकर्षणाचा केंद्रबिंदू

SCROLL FOR NEXT