मुंबई

सूर्यघर योजनेत राज्याची आघाडी

CD

सूर्यघर योजनेत राज्याची आघाडी
१,७२२ मेगावॉटचे सौर प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, आतापर्यंत तब्बल १,७२२ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. चार लाख ६५ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले असून, वीजबिलावर खर्च होणारी जादाची रक्कम कमी झाली आहे.
केंद्र सरकारने सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी फेब्रुवारी २०२४मध्ये ही योजना लागू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरण ही वीज वितरण कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करीत आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत राज्यातील लाखो घरगुती वीज ग्राहकांना योजनेचा लाभ झाला असून, त्यांची एकत्रित सौरऊर्जानिर्मिती क्षमता १,७२२ मेगावॅट आहे. त्यामुळे संबंधित वीज ग्राहकांचे वीजबिल कमी होण्यास मदत झाली आहे.
...
१७ गावे सौरग्राम
या योजनेचा वापर करून महावितरणने संपूर्ण गाव सौरऊर्जेवर चालविण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली असून, आतापर्यंत १७ गावे सौरग्राम झाली आहेत. तसेच राज्य सरकारने या योजनेत वीज ग्राहकाला मिळणाऱ्या अनुदानात स्वतःकडून भर घालून दारिद्र्यरेषेखालील अथवा गरीब अशा पाच लाख कुटुंबांना अत्यंत कमी रकमेत योजनेचा लाभ मिळवून देणारी स्मार्ट योजना सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT