मुंबई

कूपर रुग्णालयात श्वान-मांजरांचा त्रास कायम

CD

कूपर रुग्णालयात श्वान-मांजरांचा त्रास कायम
महिन्यानंतर उपाययोजना ठप्प; रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील भटक्या श्वानांचा प्रश्न अद्यापही कायम असून, महिना उलटूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. रुग्णालय परिसर आणि वॉर्डात श्वानांसह मांजरांचाही वावर वाढल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
वारंवार यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतरही उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कूपर रुग्णालय आहे की कुत्र्या-मांजरांचा अड्डा, पालिका प्रशासनाला रुग्णांच्या आरोग्याची काळजी नाही का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देवदास शेट्टी यांनी संबंधित यंत्रणांसोबत बैठका घेतल्याची माहिती दिली. भटक्या श्वानांसाठी आश्रयस्थळ उभारण्यास वेळ लागणार आहे. बाहेरील काही लोक रुग्णालयात घुसून प्राण्यांना अन्न देतात आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना विरोध करतात,'' असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्राणीप्रेमींनी या श्वानांना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
रुग्णालय परिसरात सहज अन्न उपलब्ध होत असल्याने भटक्या प्राण्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. परिणामी, चावा घेण्याच्या घटना, अस्वच्छता आणि संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती कायम राहणे चिंताजनक असून, महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्राणीप्रेमींचाही उपद्रव
रुग्णालय परिसरात भटक्या प्राण्यांना नियमित अन्न वाढले जाते. त्यामुळे श्वानांची संख्या वाढली असून, अन्न पदार्थ देणाऱ्या व्यक्तींना तसे न करण्यास सांगितल्यास ते रोष व्यक्त करत असल्याचे येथील सुरक्षा रक्षकाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : जनगणना परिषद आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावता परिषदकडून नियोजन बैठकीचे आयोजन

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT