विनाअपघात सेवेसाठी एसटीचालकांचा सन्मान
दीड ते २० हजार रुपयांचे मिळणार बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सेवेसाठी एसटीचालकांचा वर्धापनदिनी सन्मान करण्यात येणार आहे. या चालकांना दीड हजार ते २० हजार रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.
योजनेअंतर्गत दिवसांची गणना १ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल आणि प्रत्येक आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) कोणताही अपघात होणार नाही याची खात्री आवश्यक आहे. प्रत्येक आगारात चालकांच्या विनाअपघात सेवेची स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आणि मासिक कामगिरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एक आणि दाेन वर्षांत पात्र ठरलेल्या चालकांचा बक्षीस वितरण समारंभ एसटी महामंडळ वर्धापनदिनी १ जून २०२६ला होणार आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत किमान २६० दिवस विनाअपघात स्टेअरिंग ड्युटी बजावणाऱ्यांना १,५०० रुपये बक्षीस मिळणार आहे. चालक आणि वाहक दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांसाठीही २६०पैकी १०० दिवस विनाअपघात चालकाची सेवा केल्यास समान रक्कम देण्यात येणार आहे.
दुसऱ्या वर्षात २६० दिवस (किंवा चालक-वाहकांसाठी १०० दिवस) विनाअपघात सेवा पूर्ण करणाऱ्यांना एक हजार रुपये बक्षीस मिळेल. दोन्ही वर्षांत एकूण २६० दिवसांची कामगिरी अपेक्षित आहे. दीर्घकालीन प्रोत्साहनासाठी सलग पाच वर्षांत प्रतिवर्षी २६० दिवस विनाअपघात सेवेसाठी पाच हजार रुपये, १० वर्षांसाठी १० हजार रुपये, १५ वर्षांसाठी १५ हजार रुपये आणि २० वर्षांसाठी २० हजार रुपये बक्षीस दिले जाईल. खाते वाहनांवर काम करणाऱ्या चालकांना या योजनेत समान लाभ मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.