मुंबई

एसटीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत बस प्रवासासाठी एनसीएमसीकार्ड बंधनकारक

CD

एनसीएमसी कार्ड बंधनकारक
एसटीच्या सेवानिवृत्त ांना मोफत बस प्रवास
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पाससाठी जुलै २०२६ पासून ‘रूपे ऑन द गो इनॅबल विथ एनसीएमसी  कार्ड’ हे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड सशुल्क असेल आणि ते घेतल्याशिवाय मोफत प्रवासाची सुविधा मिळणार नाही. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी काढले आहे. 
एसटी महामंडळाच्या नवीन परिपत्रकानुसार, सेवानिवृत्त कर्मचारी, वैद्यकीय अपात्र झालेले कर्मचारी, त्यांचे पती-पत्नी, विधवा-विधुर यांना एप्रिल महिन्यापासून वर्षभरासाठी मोफत बस पास मिळेल. यात साध्या बससह सर्व रा. प. बसचा समावेश आहे. तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा-विधुरालाही हा लाभ मिळेल. ज्यांची मुलगी-मुलगा रा. प. सेवेत आहे त्यांना कौटुंबिक पासमधून नाव काढून स्वतंत्र पास मिळेल. मोफत पासवर साध्या बस आणि रा. प. बस भाड्यातील फरक भरून प्रवास करता येईल. याशिवाय अपघात सहाय्यता निधी आणि स्वच्छता अधिभारही लागू होईल. हे सर्व पास देताना संबंधित कार्यालयाने नोंद करून सूचना द्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

डिजिटल पेमेंटची सोय
एनसीएमसी   कार्डची नोंदणी आणि वितरण २५१ आगारांतील अधिकृत एजंट, ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष आणि  एनएसडीएल पेमेंट बँकेच्या ३,००० हून अधिक एजंटकडे होईल. पूर्वीच्या पत्रामधील सूचना कायम असून, हे परिपत्रक सर्व आगार, विभागांवर प्रसिद्ध करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिजिटल पेमेंटची सोय मिळेल, पण कार्डसाठी शुल्क भरावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belhe Jejuri Highway : बेल्हा-जजुरी महामार्गावरील नवीन पुलाचे काम अद्याप अपुर्णच; नदीला पुर आल्यास नागरिकांची होणार गैरसोय..

Ambajogai Crime : मंच्युरियनमधून दिलं गुंगीचं औषध, मग फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; अंबाजोगाईतील 'त्या' 20 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बुलढाणा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 5.78 लाखांचा गुटखा जप्त

कसलं भारी! मराठमोळ्या अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; मिळणार अस्सल मालवणी पदार्थ; नाव तर एकदम युनिक

Love Numerology : 'या' मुलांकाचे लोक जोडीदारावर करतात प्रचंड प्रेम; धोका देणं तर लांबच, जरासुद्धा दुखावत नाहीत

SCROLL FOR NEXT