मुंबई

बेघर नागरिकांनी छायाचित्रांद्वारे आपली कथा मांडण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी

CD

बेघर नागरिकांनी छायाचित्रांद्वारे मांडली आपली व्यथा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : बेघर नागरिकांनी छायाचित्रांद्वारे आपली कथा मांडण्याचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी असल्याचे निवृत्त आयएएस अधिकारी व राज्यस्तरीय निवारा देखरेख समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी सांगितले. या उपक्रमाचे विशेष कौतुक करत महाविद्यालयीन काळातील छायाचित्रणाच्या आठवणी त्यांनी सांगितली.

‘माय मुंबई’ हे बेघर नागरिकांच्या नजरेतून साकारलेली अद्वितीय छायाचित्र कधीही कॅमेरा हातात न घेतलेल्या बेघर नागरिकांनी टिपलेली आहेत. या कलाकृतीचे प्रदर्शन पहचान संस्थेच्या वतीने मुंबई प्रेस क्लब येथे भरविण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये बेघर नागरिकांनी स्वतः काढलेली मुंबईची छायाचित्रे सादर केली. त्यांच्या नजरेतून शहर पाहण्याची एक वेगळी, संवेदनशील आणि विचारप्रवर्तक संधी यामुळे निर्माण झाली. ३५ बेघर व्यक्तींनी फ्युजीफिल्म क्वीकस्नॅप डिस्पोजेबल कॅमेऱ्यांचा वापर करून एकूण ९४५ छायाचित्रे टिपली आहेत.
भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी पहचान संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत, बेघरांसाठी निवारा आणि त्यांच्या आवाजाला बळ देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. संस्थेचे संस्थापक बृजेश आर्य यांनी प्रकल्पामागील प्रेरणा स्पष्ट करताना, गेल्या दोन वर्षांत झालेल्या यशस्वी प्रदर्शनांचा आढावा घेतला. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बेघर छायाचित्रकारांनी या उपक्रमाला केवळ प्रदर्शन न ठेवता स्वतःच्या अस्तित्वाचा, भावना आणि संघर्षाचा प्रभावी आवाज दिला. ‘माय मुंबई’ हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे संकलन नसून, समाजातील दुर्लक्षित घटकांच्या नजरेतून उलगडणारी मुंबईची एक वेगळी, संवेदनशील आणि हृदयस्पर्शी गोष्ट ठरली आहे. या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. भालचंद्र मुणगेकर, माजी उपमहापौर अरुण देव, अमरजीत मिश्रा, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT