

World Test Championship expansion 12 teams
ESakal
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एक मोठा बदल होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर जय शाह यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील हंगामात १२ संघ खेळतील. डब्ल्यूटीसीचा पुढील हंगाम २०२७ मध्ये सुरू होईल. सध्या या स्पर्धेत नऊ संघ सहभागी झाले असून, आणखी तीन संघ सामील होणार आहेत.