मुंबई

वृक्षताेडीवरून खडाजंगी!

CD

वृक्षताेडीवरून खडाजंगी!

‘गारगाई’वरून विराेधकांचा आक्षेप; गोंधळातच वाढीव खर्च प्रस्ताव मंजूर

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या महासभेत आज गारगाई धरण प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. तीन लाख झाडांची कत्तल आणि प्रकल्पाच्या खर्चात झालेली तब्बल दाेन हजार कोटींची वाढ यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र महापौर रितू तावडे यांनी या गाेंधळातच हा प्रस्ताव मंजूर करून विरोधकांचा डाव उलटवला.

शिवसेना (ठाकरे गट) नेते यशोधन फणसे यांनी प्रस्तावावर स्थगितीची उपसूचना मांडली. ‘प्रकल्पासाठी तीन लाख १० हजार झाडे तोडावी लागणार असून सहा गावे पाण्याखाली जाणार आहेत. केंद्र सरकारची परवानगी नसतानाही कंत्राटदाराला पैसे दिले जात आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. गारगाईला पर्याय म्हणून मनोरी येथील निःक्षारीकरण प्रकल्प राबवण्याची मागणी त्यांनी केली.

​काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी खर्चाच्या फुगवट्यावर तोफ डागली. ‘२०२२मध्ये २,३०० कोटींचा असलेला हा प्रकल्प २०२५मध्ये ५,३०० कोटींवर गेला आहे. काम काहीच नाही; पण खर्च दोन हजार कोटींनी वाढला,’ अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर ‘छेडागिरी’ आणि ‘शेखचिल्लीचे स्वप्न’ अशा शब्दांत टीका केल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विशाखा राऊत यांनी सांडपाणी पुनर्वापराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर सचिन पडवळ यांनी पाणीचोरी आणि गळती रोखण्यावर भर देण्यास सांगितले. भाजपच्या वतीने प्रवीण छेडा आणि प्रकाश दरेकर यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
----
महापाैरांची खेळी
चर्चेनंतर विरोधकांनी या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली होती; मात्र गोंधळाचा फायदा घेऊन महापौर रितू तावडे यांनी अचानक प्रस्ताव मंजुरीसाठी पुकारला आणि तो मंजूर झाल्याचे घोषित केले. विरोधकांनी आरडाओरडा करताच महापौर म्हणाल्या, ‘मी तुमच्याकडे बघूनच प्रस्ताव पुकारला होता; पण कोणी प्रतिसाद दिला नाही.’ महापौरांच्या या अनपेक्षित खेळीमुळे विरोधक थक्क झाले आणि कोट्यवधींचा हा वादग्रस्त प्रस्ताव गोंधळातच मार्गी लागला.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

SCROLL FOR NEXT