मुंबई

शाळा सोडल्याचा दाखला ईमेलवर

CD

शाळा सोडल्याचा दाखला ई-मेलवर
ओशिवरातील सिटी शाळेच्या संस्थाचालकाचा प्रताप

मुंबई, ता. १० ः ओशिवरा येथील सिटी इंटरनॅशनल खासगी शाळेकडून आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या १३८ हून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना ई-मेलच्या माध्यमातून शाळा सोडल्याचा दाखला पाठवण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले होते.
ई-मेलच्या माध्यमातून शाळा सोडल्याचा दाखला पाठवला जात असल्याचे लक्षात आल्याने शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या शाळेविरोधात कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. शाळेकडून अशा प्रकारे शाळा सोडल्याचा दाखला ई-मेलवर पाठवला जात असेल तर यावर कठोर कारवाई करू, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिली. तसेच शाळेत आरटीईच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेमध्ये समायोजन करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
------------------------
संघटनांकडून विरोध
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्याचा प्रकार संस्थाचालकांकडून करण्यात येत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), अनुदानित शिक्षण बचाव समिती आदी संघटनांकडून जोरदार विरोध दर्शविला जात आहे. या संघटनांच्या शिष्टमंडळाने नुकतेच शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन या शाळेसंदर्भातील माहिती दिली. तसेच शाळा बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : Proud Of You... मजुराच्या पोरानं बंगळुरूला दिले धक्के, दिग्गजांना बाद केले अन् ९४ धावांत ६ फलंदाज तंबूत पाठवले

Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

SCROLL FOR NEXT