गळ्यातून काढला १.७५ किलोचा थायरॉईड
जीटी रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई , ता. १३ : मुंबईतील राज्य सरकारी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात एका महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेच्या गळ्यात गेल्या काही वर्षांपासून थायरॉईडची मोठी गाठ होती. अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी २५ सेमी बाय १५ सेमी आकाराचा आणि १.७५ किलो वजनाचा गोयटर यशस्वीपणे बाहेर काढला.
सामान्य थायरॉईड ग्रंथीचे वजन साधारण २५ ग्रॅम असते, परंतु या प्रकरणात ते तब्बल १.७५ किलो होते. वाढलेल्या या गाठीमुळे महिलेला श्वास घेणे आणि अन्न गिळणे कठीण झाले होते. गेल्या १० वर्षांत तिचा त्रास प्रचंड वाढला होता.
डॉक्टरांच्या निरीक्षणांनुसार, या महिलेच्या तिन्ही बहिणींनाही असाच त्रास होता, तर कुटुंबातील पुरुषांना मात्र हा त्रास नव्हता. यावरून हा विकार लिंग-संबंधित आनुवंशिक असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान श्वासनलिका, अन्ननलिका आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना इजा न पोहोचवता ही गाठ काढणे मोठे आव्हान होते. डॉ. जितेंद्र संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करणारे डॉ. जितेंद्र संकपाळ म्हणाले की, गळ्यातील कोणत्याही सूजेकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः जर कुटुंबात असा इतिहास असेल, तर त्वरित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी उपचार मिळाले असते, तर या महिलेला ४५ वर्षे इतका त्रास सहन करावा लागला नसता.
सद्यःस्थिती शस्त्रक्रियेनंतर महिलेला रक्त चढवण्यात आले असून, तिची प्रकृती आता स्थिर आहे आणि ती रिकव्हर होत आहे. हे तिच्यासाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे, अशा भावना तिच्या मुलाने व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.