मुंबई

इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पुरस्कार

CD

इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पुरस्कार
मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई, ता. १० : इंडिया स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना एक लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (ता. १०) येथे केली.

लोढा यांच्या हस्ते आज कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. त्याचबरोबर राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ‘कौशल्याचार्य’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. लोढा या वेळी म्हणाले, की कौशल्य विकास विभागाने युवकांसाठी अत्याधुनिक अभ्यासक्रम राबवले असल्यानेच राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. कौशल्य विकास विभागाने युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येईल. सरकार केवळ कर्ज देऊन थांबणार नाही, तर प्रशिक्षणापासून ते मेंटॉरशिप, मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांवर तरुणांच्या पाठीशी उभे राहील. युवा शक्तीच्या जोरावर आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू. या वेळी राज्य नावीन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, डिपेक्सचे संचालक कनक कावडीवाले यासह महाराष्ट्रातील विजेत्या आयटीआयचे अधिकारी, विजेते विद्यार्थी उपस्थित होते.

प्रत्यक्ष कार्यानुभव
अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या, की देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) हा कणा आहे. राज्यातील १,१०० हून अधिक सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये उत्कृष्ट शिक्षण, उत्तम अभ्यासक्रम आणि उद्योगांशी सहकार्याने प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जाईल. विभागीय स्तरावर आपण ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स’ उभारण्याची तयारी करीत आहोत. यामध्ये आयओटी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, व्हाईट वेल्डिंग आणि ईव्ही यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत सुमारे ५४,००० विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म ट्रेनिंग मॉड्यूल्सचा लाभ मिळवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT