मुंबई

मराठी माणसाच्या हक्काच्या गाड्या बंद का? : अभ्यंकर

CD

मराठी माणसाच्या हक्काच्या
गाड्या बंद का? : अभ्यंकर

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : मुंबईतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या वारंवार बंद केल्या जात असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘याआधी कोविड किंवा तांत्रिक कारणांचे दाखले देऊन आपल्या हक्काच्या गाड्या रद्द केल्या आहेत, तर दुसरीकडे इतर राज्यांसाठी नवीन गाड्यांचा धडाका सुरू आहे,’ असा थेट आरोप त्यांनी रेल्वे प्रशासनावर केला आहे.

​अविनाश अभ्यंकर यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर मराठी द्वेषाचा आरोप करताना म्हटले की, मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी माणसांच्या गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पूर्वी ज्या गाड्या दादर किंवा सीएसएमटी या मध्यवर्ती स्थानकांवरून सुटत होत्या, त्या आता दिवा किंवा पनवेलसारख्या दूरच्या स्थानकांवर हलवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, रेल्वेचा हा निर्णय मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलण्याचाच एक भाग असल्याची टीका त्यांनी केली.

अभ्यंकर यांनी कोकणातील सत्ताधारी खासदार आणि आमदारांनाही धारेवर धरले. कोकणाने ज्यांना भरभरून मते देऊन निवडून दिले, ते खासदार आणि आमदार आज आपल्या मतदारांच्या हक्कासाठी गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे लोकप्रतिनिधी केंद्र सरकारसमोर झुकत असून, त्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्तेची ऊब अधिक महत्त्वाची वाटत आहे. रेल्वे प्रशासनाने यावर वेळीच तोडगा न काढल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT