मुंबई

रेल्वे मार्गालगत धोकादायक झाडांची छाटणी सुरू

CD

रेल्वे मार्गालगत धोकादायक झाडांची छाटणी सुरू
पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : पावसाळ्यात रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा आणि तांत्रिक बिघाड टाळता यावेत, यासाठी महापालिकेच्या ‘एफ-उत्तर’ विभागाने कंबर कसली आहे. यामध्ये हार्बर रेल्वे मार्गावरील जी. टी. बी. नगर ते चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी करण्याचे काम रविवारी (ता. १२) उद्यान विभागामार्फत करण्यात आले.

पावसाळ्यात झाडे पडल्यामुळे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटणे किंवा रुळांवर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळित होण्याचे प्रकार घडतात. या घटना टाळण्यासाठी उद्यान विभागाकडून मृत आणि धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३२५ धोकादायक, मृत झाडांची नोंद करण्यात आली होती. आजच्या कारवाईत त्यापैकी २७९ झाडे आतापर्यंत पूर्णपणे हटवण्यात आली आहेत. उर्वरित ४६ झाडे काढण्याचे काम सुरू आहे. हे सर्व काम येत्या ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. सध्याच्या या कामासाठी महापालिकेची नियुक्त केलेली एजन्सी १२ जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे. या कालावधीत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. तसेच, पुढील वर्षासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया आतापासूनच सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून पुढील कामात कोणताही खंड पडणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या या वृक्ष छाटणीत ज्या झाडांच्या फांद्या रेल्वे मार्गाला अडथळा ठरू शकतात, अशा झाडांचीही छाटणी केली जात आहे. विभागाच्या अखत्यारीत एकूण ४६,३३६ झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत १२,५६१ झाडांची छाटणी पूर्ण झाली आहे. शिल्लक ३३,७७५ झाडांची छाटणी ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षांचा वैभव फक्त 'ऑरेंज कॅप'च नव्हे, तर ४ मोठे पुरस्कार नावावर करणार... वाचा किती लाख कमावणार?

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

SCROLL FOR NEXT