दादर स्मशानभूमीची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सुमधुर आवाजाने संगीतप्रेमींच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. १३) दादर येथील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाेलिस आणि पालिकेने तेथे सायंकाळी पाहणी केली.
सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर ४ वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी रविवारी संध्याकाळी पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून दादर स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे त्याबाबत योग्य व्यवस्था, अंत्यविधी कुठे करायचा त्याबाबत पाहणीही पालिकेने केली.
पोलिसांसमोर दुहेरी आव्हान
मंगळवारी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त संपूर्ण दादर आणि विशेषतः शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसर आंबेडकर अनुयायांची गर्दी असते. रविवारपासूनच अनुयायी तेथे येण्यास सुरुवात झाली आहे. तिथेच दादर स्मशानभूमी असल्याने पोलिसांसमोर गर्दी आवरण्याचे दुहेरी आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.