मुंबई

फेरीवाल्यांना परवानगी देण्यावर आक्षेप

CD

फेरीवाल्यांना परवानगी देण्यावर आक्षेप
खासदार संजय दिना पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र; अधिकृततेला विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लोकलमधील फेरीवाल्यांना कोणतीही अधिकृतता किंवा व्यवसायाची परवानगी देऊ नये, अशी मागणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे. उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी, गाड्यांचे विलंब आणि अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांचे आधीच हाल होत असताना फेरीवाल्यांचा वाढता वावर हा अधिक गंभीर प्रश्न ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकल गाड्यांच्या डब्यांमध्ये गर्दीच्या वेळेतही फेरीवाले सर्रास प्रवेश करून वस्तूंची विक्री करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना उभे राहणे, बसणे आणि हालचाल करणेही कठीण होत असून, डब्यांतील शिस्त पूर्णपणे ढासळत आहे. विशेषतः महिलांच्या डब्यांमध्ये घडणाऱ्या चोरी, छेडछाड आणि असुरक्षिततेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अशावेळी फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन त्यांना अधिकृत करण्याची रेल्वे प्रशासनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या निर्णयामुळे नियंत्रण वाढण्याऐवजी गैरवापर वाढण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा खासदार पाटील यांनी दिला आहे.

प्रवाशांना वाढता धोका
ओळखपत्राच्या आधारे अधिक फेरीवाले बेकायदा लोकल गाड्यांमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे अनधिकृत वावरावर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी अधिक कठीण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT