कारची हवा काढणाऱ्या वृद्धाची हत्या
दोन तरुणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः पार्किंगवरून झालेल्या वादात कारची हवा काढणाऱ्या वृद्धाला दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री माटुंगा परिसरात घडली.
नरेश वाघेला (६३) असे मृताचे नाव आहे, तर शहानवाज शेख आणि साहिल घाडगे, अशी आरोपींची नावे आहेत. मृत आणि आरोपी एकाच परिसरात राहतात आणि एकमेकांना ओळखतात, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री वाघेला यांच्या घराबाहेर शेखने आपली कार पार्क केली. त्यास वाघेला यांनी विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात वाघेला यांनी शेखच्या कारच्या चाकामधली हवा काढली. त्यावरून वाद आणखी विकोपाला गेला. शेखने मित्र घाडगे याला घटनास्थळी बोलवून घेतले. दोघांनी वाघेला यांना हवा का काढली, याबाबत जाब विचारत मारहाण सुरू केली.
एका क्षणी वाघेला बेशुद्ध होत कोसळले. तेव्हा आरोपी तेथून पसार झाले. पुढे पत्नीने वाघेला यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातून या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी शेख, घाडगे यांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.