मुंबई

डेकोरेटरच्या गोदामाला आग

CD

डेकोरेटरच्या गोदामाला आग
​मुंबई, ता. १६ : गोरेगाव पश्‍चिमेतील मोतीलाल नगर परिसरात आज (ता. १६) सकाळी एका डेकोरेटरच्या साहित्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
डी-मार्टच्या समोर असलेल्या मोतीलाल नगर क्रमांक २ मधील निधी डेकोरेटर्स येथे सकाळी ९:२५ च्या सुमारास आग लागली. आगीचे स्वरूप पाहून मुंबई अग्निशमन दलाने सकाळी ९:३७ वाजता या घटनेला ‘लेव्हल-१’ ची आग म्हणून घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्यांसह पोलिस प्रशासन, रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डेकोरेशनच्या साहित्यामुळे आगीने काही काळ रौद्ररूप धारण केले होते. मात्र, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सकाळी ११:०८ वाजता आग पूर्णपणे विझवली. डेकोरेटरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्‍पष्‍ट असून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT