मुंबई

बदल न झाल्यास आमरण उपोषण

CD

बदल न झाल्यास आमरण उपोषण
कॅबचालकांचा कंपन्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ॲपमध्ये १७ एप्रिलला अपेक्षित बदल झाले नाहीत, तर १८ एप्रिलपासून तीन कॅबचालकांकडून आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असे संघटनेने आज सांगितले. ॲप-आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराबाबत गुरुवारी ॲप-आधारित कंपन्यांसोबत परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले की, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली ओला, उबर आणि रॅपिडो या ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये ॲप-आधारित कॅबसेवांवर सरकारमान्य दर लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान रॅपिडो कंपनीने कॅबचालकांचे होत असलेले आर्थिक नुकसान मान्य करत त्यासाठी एक गुगल फॉर्म प्रसारित करण्याची घोषणा केली. या फॉर्ममध्ये चालकांनी त्यांच्या ट्रिपचे स्क्रीनशॉट अपलोड केल्यास, संबंधित नुकसानभरपाई थेट चालकांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे रॅपिडोच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
ओला आणि उबर या कंपन्यांनी त्यांच्या ॲपवरील दरांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सहाय्यक आयुक्तांकडे मुदत मागितली असून, ती मान्य करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
...
ओला, उबर आणि रॅपिडोच्या भाडेदराबाबत कंपन्याच्या प्रतिनिधिंशी चर्चा झाली. यामध्ये दर लागू करण्यात आले असून, त्याबाबतची माहिती चालकांना देण्यात येईल.
- भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT