मुंबई

आणखी एक एमबीए विद्यार्थी अटकेत

CD

आणखी एक एमबीए विद्यार्थी अटकेत
नेस्को ड्रग्ज प्रकरण; २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई, ता. १७ ः नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात वनराई पोलिसांनी शुक्रवारी शुभ अगरवाल (वय २१) या आणखी एका एमबीए विद्यार्थ्यास अटक केली. या कॉन्सर्टमध्ये पार्टी ड्रग एक्स्टॅसीच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप शुभवर आहे. न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या कॉन्सर्टमध्ये दक्षिण मुंबईतील नामांकित एमबीए महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमारे २५ विद्यार्थ्यांचा समूह सहभागी झाला होता. त्यातील तिघे एक्स्टॅसी आणि मद्याच्या अतिसेवनामुळे अत्यवस्थ झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. याच समूहातील प्रतीक पांडे, रौनक खंडेलवाल यांनी आपल्या अन्य मित्रमैत्रिणींना एक्स्टॅसीच्या गोळ्या पुरवल्या. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पांडेला अन्य अटक आरोपी आनंद पटेल याने शुभमार्फत एक्स्टॅसीच्या २० गोळ्या पोहोच केल्या. या आधीही पटेलने शुभमार्फत पांडेपर्यंत एक्स्टॅसी गोळ्या पोहोच केल्या आहेत. या माहितीआधारे वनराई पोलिसांनी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातून शुभ यास अटक केली. तपासात ११ एप्रिलला त्याने दक्षिण मुंबईत पांडे यास एक्स्टॅसी गोळ्या पोहोच केल्या. त्यानंतर तो नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ९×९ टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्येही सहभागी झाला होता. त्या वेळी अन्य अटक व फरार आरोपींसोबत तो संपर्कात होता. शुभ कल्याणचा रहिवासी असून, अंधेरीतील महाविद्यालयात एमबीए शिकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...
शुभ अनभिज्ञ!
बचाव पक्षाचे वकील ॲड. आझाद गुप्ता यांनी पोलिसांचे आरोप फेटाळले. पटेलने एक खोका शुभच्या हाती देत तो पांडेपर्यंत पोहोच करण्यास सांगितले होते. शुभ यास त्यात काय आहे, हे माहीत नव्हते, असा युक्तिवाद ॲड. गुप्ता यांनी केला.
...
अटकेसाठी आठ पथके
गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आयुष याच्या अटकेसाठी वनराई पोलिसांनी आठ पथके स्थापन केली असून, त्यातील काही मुंबईबाहेर विविध ठिकाणी रवाना झाल्याचे समजते. आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणातील एक्स्टॅसी गोळ्यांचा मुख्य स्रोत आयुष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...
मुंबईत सर्वत्र...
अटक आरोपींनी नेस्कोव्यतिरिक्त शहरात अन्य ठिकाणी आयोजित कॉन्सर्टमध्येही पार्टी ड्रग एक्स्टॅसी विकल्याचे संशय आहे. त्या दृष्टीने अटक आरोपींकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT