मुंबई

कॉन्सर्ट होणारच, ड्रग्ज विकून दाखवा!

CD

कॉन्सर्ट होणारच, ड्रग्ज विकून दाखवा!
मुंबई पोलिसांची आक्रमक भूमिका

मुंबई, ता. १७ ः नेस्को प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात होऊ घातलेल्या कॉन्सर्टना परवानगी नाकारली जाईल, या शक्यतेला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फाटा दिला. परवानगी नाकारून नामुष्की ओढवून घेण्याऐवजी पोलिसांनी कॉन्सर्ट होणारच, अमली पदार्थ विकून दाखवा, अशी आक्रमक भूमिका घेतली.
शिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. १८) विख्यात स्कॉटिश डीजे, गायक, गीतकार केल्विन हॅरिस (ॲडम रिचर्ड वाईल्स) यांचा कॉन्सर्ट होणार आहे. त्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे १५ हजार रसिकांनी या कॉन्सर्टचे आरक्षण केले आहे. मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेस्को प्रकरणातून पुढे आलेले वास्तव मुंबई पोलिसांसाठी आव्हान आहे. अचूक व्यूहरचना आखून ते पेलावे, अशी आयुक्त देवेन भारती यांची स्पष्ट भूमिका आहे. परवानगी नाकारून ठरलेले कॉन्सर्ट रद्द करणे, याचा अर्थ मुंबई पोलिस सक्षम नाहीत, असा होतो. तो आयुक्तांसह संपूर्ण पोलिस दलाला अमान्य आहे. त्यामुळे केल्विन हॅरिससह उर्वरित देशीविदेशी कलावंतांचे कॉन्सर्ट ठरल्याप्रमाणेच होतील. फक्त त्या कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ पोहोचणार नाहीत, खिसेकापू आत शिरणार नाहीत, महिलांविरोधी गुन्हे घडणार नाहीत, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...
खबरदारीचे उपाय
१. आतापर्यंत परवानगीपुरते मर्यादित पोलिस शनिवारी होऊ घातलेल्या केल्विन हॅरिस यांच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होतील, सहभागी गर्दीवर लक्ष ठेवतील. विशेष म्हणजे, साध्या वेशातील पोलिस गर्दीत मिसळतील.
२. प्रवेशद्वारावर आयोजकांनी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांकरवी कॉन्सर्टसाठी आत येणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती होईल. पोलिस त्या झाडाझडतीवर प्रत्यक्ष आणि सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवतील.
३. कॉन्सर्टस्थळी अर्थात शिवडी येथे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर दुपारपासून विशेष नाकाबंदीचे आयोजन केले जाईल.
४. कॉन्सर्ट स्थळाबाहेर मुबलक पोलिस मनुष्यबळ आणि पोलिस दलातील वाहने तैनात असतील. त्यात अमली पदार्थविरोधी यंत्रणांचा सहभाग असेल. खबऱ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ विशेषतः पार्टी ड्रग्ज विक्रेत्यांची इत्थंभूत माहिती काढण्यावर भर दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT