अपहृत तरुणाला देहविक्रीस भाग पाडणारा अटकेत
मुंबई, ता. १९ : अल्पवयीन तरुणाचे अपहरण करून तृतीयपंथीच्या वेशात त्यास भिक्षा मागण्यास, देहविक्रीस भाग पाडणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने नवी मुंबईतून अटक केली. बाबू आयनल खान ऊर्फ बाबू गुरू ऊर्फ बाबू (३०) असे त्याचे नाव असून, तो बांगलादेशी नागरिक आहे. गोवंडी परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचे अपहरण करून आरोपीने त्याला तृतीयपंथीच्या वेशात उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये भीक मागण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्याकडून देहविक्री करून घेतली. या कृत्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक भरत घोणे यांना प्राप्त झाली. त्याआधारे पथकाने आरोपीस अटक केली. आरोपी खानविरोधात हत्या, अपहरणाचे गुन्हे नोंद आहेत. विशेष म्हणजे अवैधरीत्या देशात घुसखोरी केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्या खटल्यातून तो जामिनावर सुटला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.