मुंबई

नगरसेवकांसाठी स्वतंत्र पार्किंगला विरोध

CD

नगरसेवकांसाठी स्वतंत्र पार्किंगला विरोध
मेट्रो किंवा बेस्टने प्रवास करा; आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २१ : महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या भूखंडावर नगरसेवकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. नगरसेवकांनी स्वतःच्या गाड्यांसाठी पार्किंगची मागणी करण्याऐवजी बेस्ट बस किंवा मेट्रो-३ यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशी भूमिका घेत एका सामाजिक संस्थेने पालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
​काही दिवसांपूर्वी पालिकेबाहेर मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुमारे २० नगरसेवकांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर भाजप पुरस्कृत एका प्रस्तावाद्वारे पालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेवर नगरसेवकांसाठी स्वतंत्र पार्किंग आणि नवीन सभागृह उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
कन्झर्व्हेशन ॲक्शन ट्रस्ट या सामाजिक संस्थेने पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून यावर आक्षेप घेतला आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, जे नगरसेवक बेकायदा पार्किंगचा दंड भरण्यास कचरत आहेत त्यांनी खरं तर बेस्ट आणि नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रो-३ सेवेचा लाभ घ्यावा. लोकप्रतिनिधींनीच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आदर्श घालून दिला पाहिजे. नवीन बांधकाम करण्याऐवजी सध्याच्या पालिका जिमखान्याचे नूतनीकरण करावे. हा जिमखाना केवळ पालिकेच्याच नव्हे तर इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही खुला करावा, जेणेकरून त्याचा वापर वाढेल.
​या पत्राद्वारे वडाळ्यातील मिठागराच्या जमिनीवर आयएएस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र जिमखाना उभारण्याच्या चर्चेवरही आक्षेप घेण्यात आला आहे. मिठागराच्या जमिनीवर कोणतेही बांधकाम करणे हे कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन ठरेल, असा इशारा कॅटने दिला आहे. त्याऐवजी मंत्रालयाजवळील सचिवालय जिमखान्याचेच नूतनीकरण करून अधिकाऱ्यांच्या सुविधेसाठी तो अधिक सक्षम करावा, अशी सूचना या संस्थेने केली आहे.
सामाजिक संस्थेने आपल्या पत्रात पर्यावरणाच्या मुद्द्यावर विशेष भर दिला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा आणि मिठागरे ही शहराची फुप्फुसे आहेत. त्यामुळे तिथे कोणतेही नवीन बांधकाम न करता आहे त्या सुविधांचा योग्य वापर करण्यावर भर द्यावा, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वाहतूक कोंडीची समस्याही कमी होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Sea tension: लाल समुद्रात इस्रायली जहाजांना बंदी! हूती बंडखोरांचा मोठा निर्णय; दिसताच हल्ला करण्याची धमकी

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

Mumbai: मुंबईतील विहार तलावाला पौर्तुगीजकालीन इतिहास, पावणेचारशे वर्षांपूर्वीचे अवशेष अजूनही जिवंत

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागेला फटका

MSRTC Bus Trouble: दे धक्का! ४५ किमी प्रवासात लालपरी ५-६ वेळा बंद पडली, प्रवाशांवरच ढकलण्याची वेळ

SCROLL FOR NEXT