मुंबई

चिन्हांवरून ठरतो दर्जा?

CD

चिन्हांवरून ठरतो दर्जा?
‘एक्स्टॅसी’ला एलएसडीच्या निकषांबाबत पोलिसांची चौकशी

जयेश शिरसाट : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : नेस्को, साकीनाका, टिटवाळ्यासह अन्य प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या एक्स्टॅसी गोळ्यांवर (एमडीएमए) मर्सिडीज, ऑडी, ॲपल, नाईके आदी आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे बोधचिन्ह आढळले. एलएसडी या रासायनिक अमली पदार्थांप्रमाणेच अशी चिन्हे एक्स्टॅसी गोळ्यांचा दर्जा ठरवतात का, त्यात देशी-विदेशी असा फरक आहे का, याबाबतही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तब्‍बल दोन दिवस नशेचा अनुभव देणाऱ्या आणि टपाल तिकिटाइतक्या आकाराच्या एलएसडी पेपरवरील चित्र त्याचा दर्जा आणि किंमत निश्चित करते. प्रामुख्याने युरोप, अमेरिकेत उत्पादित होऊन भारतात चोरट्या मार्गांनी दाखल होणाऱ्या एलएसडी पेपरवर पूर्वी विविध देवी-देवतांची चित्रे आढळत होती. त्यापैकी नटराजाचे चित्र असलेला एलएसडी पेपर दर्जेदार समजला जात असे. पोलिसांच्या लेखीही नटराज म्हणजे उच्चप्रतीचे एलएसडी, हेच समीकरण होते.
आहारी गेलेले नशेखोर चिलीम सुलगावण्याआधीच चरसचा दर्जा ओळखू शकतात. आगपेटीच्या एका काडीवर जो चरस गरम होतो, नरम पडतो किंवा तंबाखूत सहज मळता येतो, तो दर्जेदार समजला जातो. या चरसला अधिक मागणी असते आणि त्यासाठी चार पैसे अधिक मोजण्याची तयारीही. हेच निकष आता एक्स्टॅसी गोळ्यांना लागू पडतात का, याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. सर्वसाधारणपणे तरुणांना आकर्षित करण्यासाठी, स्टेटस सिम्बॉलसाठी ही बोधचिन्हे त्यावर छापली असावी, असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
----
युरोप उत्पादनाचे हब
नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि पश्चिम युरोपातील अन्य काही देश एक्स्टॅसी उत्पादनाचे हब म्हणून ओळखले जातात. त्याखालोखाल उत्तर अमेरिका, कॅनडा येथे उत्पादन होते. थोडाफार फरक वगळल्यास याच देशांमध्ये एलएसडी तयार केले जाते. याच देशांतून ही दोन्ही रासायनिक अमली पदार्थ भारतात चोरट्या मार्गाने पाठवले जातात, असा तपास यंत्रणांचा कयास होता.
---
भारतातही उत्पादन?
आतापर्यंत ठरावीक रंगांमध्ये उपलब्ध होणाऱ्या एक्स्टॅसीच्या गोळ्या टिटवाळ्यातील कारवाईत मात्र विविध रंगांमध्ये आढळल्या. त्यामुळे याबाबत युरोपीय देशांची मक्तेदारी मोडून भारतातही त्याचे उत्पादन सुरू झाले का, याच्याही मुळाशी जाणार आहोत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
---
अन्यत्र उत्पादन कठीण
रसायनशास्त्रातील सखोल ज्ञान असलेल्या व्यक्ती, प्रतिबंधित रसायन सहज उपलब्ध होत नसल्याने ठरावीक देश वगळल्यास अन्यत्र या अमली पदार्थांचे उत्पादन कठीण असल्याचे समजले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT