मुंबई

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली!

CD

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली!
वरळी, पवईत स्वच्छ हवा; काही भागांत अजूनही ‘मध्यम’ ते ‘खराब’ स्थिती
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २३ : मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत (एक्यूआय) सुधारणा पाहायला मिळत असून, आज (ता. २३) मुंबईचा सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक ७२ इतका नोंदवण्यात आला आहे. हवामान खात्याने हा दर्जा ‘समाधानकारक’ श्रेणीत ठेवला असून, यामुळे मुंबईकरांना वाढत्या उकाड्यात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईचा सरासरी निर्देशांक कमी असला तरी काही उपनगरांमध्ये प्रदूषणाची पातळी अद्याप जास्त आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार,​ देवनार १५० (सर्वात जास्त प्रदूषण),​ वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) १२१, ​चकाला-अंधेरी पूर्व ११० आणि ​घाटकोपर ९१ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे.
​याउलट शीव (सायन) येथे सर्वात स्वच्छ हवा (निर्देशांक २९) नोंदवण्यात आली असून, वरळी (३५) आणि पवई (३९) भागातील हवेचा दर्जा उत्तम राहिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याची हवेची स्थिती पाहता सर्वसामान्यांना फारसा धोका नाही. मात्र, फुप्फुसाचे आजार असलेल्या किंवा अतिसंवेदनशील व्यक्तींना श्वसनाचा किरकोळ त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी प्रदूषित भागांत फिरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​एप्रिल महिन्याचा कल
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १० ते १४ तारखेदरम्यान मुंबईचा एक्यूआय १०० च्या वर गेल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून यात घट होताना दिसत आहे. २१ एप्रिलला ९१ असलेला निर्देशांक आज ७२ वर खाली आला आहे. मुंबईतील एकूण ३० केंद्रांपैकी २४ केंद्रे सध्या कार्यरत असून त्याद्वारे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात आहे.

क्षेत्र एक्यूआय पातळी हवेचा दर्जा
- मुंबई शहर (सरासरी) ७२ समाधानकारक
- सर्वाधिक प्रदूषित विभाग
* ​देवनार : १५०
​* बीकेसी : १२१
​* चकाला-अंधेरी पूर्व : ११०

- सर्वात स्वच्छ हवा असलेले विभाग
​* शीव : २९
​* वरळी : ३५
​* पवई : ३९
​* शिवडी : ४९

​गेल्या पाच दिवसांचा कल
​* १९ एप्रिल : ८९
* ​२० एप्रिल : ८३
* ​२१ एप्रिल : ९१
​* २२ एप्रिल : ७९
​* २३ एप्रिल : ७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT