मुंबई

भांडुपमध्ये खळबळजनक घटना; एसआरए इमारतीच्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, १० जखमी

CD

खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, १० जखमी
भांडुपमध्ये एसआरए बांधकामाच्या ठिकाणी घटना
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : भांडुप पश्चिम येथील जनता मार्केटजवळील मेट्रो मॉल परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांपैकी ११ जण शेजारीच सुरू असलेल्या एसआरए इमारतीच्या बांधकामाच्या खड्ड्यात पडले. या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य १० जण जखमी झाले आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो मॉलजवळील मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री लग्न समारंभ सुरू होता. रात्री ११:३० च्या सुमारास या सोहळ्याला आलेले काही लोक कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेत असताना, शेजारीच सुरू असलेल्या एसआरए इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात अचानक कोसळले. खड्ड्याभोवती पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने खड्ड्यात पडलेल्या ११ जणांना बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना फोर्टिस, क्रिटिकेअर आणि अग्रवाल रुग्णालयात हलवण्यात आले. ​फोर्टिस रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेल्या भालचंद्र फाल्ले (२५ वय) या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अन्य दोन जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ​क्रिटिकेअर रुग्णालय येथे श्रेयस सुर्वे (२५ वय) याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. इतर सहा जणांना किरकोळ दुखापतीमुळे उपचार करून सोडण्यात आले. ​अग्रवाल रुग्णालयात हरिशंकर करवा (४३ वय) यांना दाखल करण्यात आले असून, त्यांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले होते का, याची चौकशी पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून केली जात आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत घटनास्थळाची पाहणी आणि मदतकार्य पूर्ण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT