मुंबई

मुंबईत मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव

CD

जागतिक मलेरिया दिन विशेष
मुंबईत मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव
दररोज २८ नवे रुग्ण; तीन वर्षांत ३९ टक्के वाढ

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईसह महानगरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. २०२५ या वर्षात मुंबईत दररोज सरासरी २८ जण मलेरियाने संक्रमित होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा वेगाने प्रसार होत आहे.
दरवर्षी २५ एप्रिलला जागतिक मलेरिया दिन असतो. यानिमित्ताने जनजागृती वाढवणे आणि मलेरियाविरोधातील लढा अधिक बळकट करणे हा उद्देश असतो. मात्र, उपलब्ध आकडेवारीनुसार परिस्थिती चिंताजनकच आहे. २०२३मध्ये मुंबईत ७,३१९ रुग्ण आढळले होते, २०२४मध्ये ही संख्या ८,७१० वर पोहोचली, तर २०२५मध्ये ती वाढून १०,१६२ झाली. म्हणजेच तीन वर्षांत तब्बल ३९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलदरम्यान राज्यात एकूण २,७२० रुग्ण आढळले असून, त्यापैकी सर्वाधिक १,७७३ प्रकरणे मुंबईतील आहेत. यावरून आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न अद्याप अपुरे ठरत असल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षी लवकर आलेला पावसाळा आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे डासांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण तयार झाले. तसेच शहरात सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील बांधकामेही डासांच्या उत्पत्तीची केंद्रे ठरत आहेत.
...
दोन वर्षांत १४ मृत्यू
मलेरियामुळे मृत्यूंच्या घटनाही चिंताजनक आहेत. मागील दोन वर्षांत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला असून, २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांत प्रत्येकी सात रुग्णांचा बळी गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर उपचार न मिळाल्यास मलेरिया गंभीर व जीवघेणा ठरू शकतो.
...
राज्यातही वाढता कल
महाराष्ट्रातही मलेरियाचा वाढता कल दिसून येत आहे. २०२३मध्ये १६,१५९, २०२४ मध्ये २१,०७९ आणि २०२५मध्ये २२,८३८ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे मुंबईत आढळली आहेत.
...
कशी घ्याल काळजी?
मलेरियापासून बचावासाठी घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये. कूलर, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ ठेवून झाकून ठेवाव्यात. मच्छरदाणीचा वापर करावा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.
...
लक्षणे ओळखा
ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, उलटी अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT