मुंबई

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला हिरवा कंदील

CD

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला हिरवा कंदील

‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ नाव प्रस्तावित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : परळ येथील शतकोत्तर परंपरा असलेल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नवे नाव देण्यास आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. आता अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या विराेधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

बदलत्या काळानुसार आणि स्वदेशी विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने १९२६मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेचे नामांतर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ मार्च २०२६ला आरोग्य समितीकडे पत्र पाठवून नामांतराची मागणी केली होती. त्यानुसार केईएम रुग्णालयाला एकलव्याच्या नावाशी निगडित नवीन ओळख देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला हाेता.
...
डाॅक्टरांचे मत विचारात नाहीच
केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी नाव बदलाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रक्रियेत आमचे मत विचारात न घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
....
अडचणी काय?
तज्ज्ञांच्या मते,  केईएम या नावाने जगभरात या रुग्णालयाची ओळख आहे. या  नावावर आधारित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, डॉक्टरांची ओळख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता जोडलेली आहे. त्यामुळे  नाव  बदलल्यास विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  त्यामुळे  नाव  बदलण्याच्या सूचनेवर फेरविचार व्हावा, असे मत यापूर्वी अनेकदा डॉक्टरांनी मांडले होते.
....
आरोग्य समितीत नमांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला. याआधीही हा विषय आला होता. केईएम हे नाव लँडमार्क असून, नाव बदलण्यापेक्षा आतल्या सुविधा सुधारण्याची गरज आहे. जगभरातील रुग्ण येत असल्याने आणखी एक केईएमसारखे रुग्णालय बांधण्याची गरज आहे. माझ्यासह अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.
- भारती पेडणेकर, नगरसेवक
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT