हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मध्य रेल्वेने रविवारी (ता. २६) हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे यादरम्यान अप व डाऊन मार्गांवर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द राहणार आहे. परतीच्या फेऱ्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल-कुर्ला यादरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन व पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.