मुंबई

सीएसएमटीत काळी जादू?

CD

सीएसएमटीत काळी जादू?
खांबांवर चित्रविचित्र आकृत्या; ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांमुळे खळबळ

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यभरात सध्या तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूविषयी चर्चेला जोर आला असताना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) खांबांवर रेखाटण्यात आलेल्या चित्रविचित्र आकृत्या, संख्यात्मक नोंदी, तसेच काही विशिष्ट शब्द रेखाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फलाट क्रमांक एकवरील खांब क्रमांक १५ आणि १६ वर ‘पॅरानॉर्मल’ शब्द, गूढ स्वरूपातील आकृत्या आणि संख्यात्मक नोंदींमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सीएसएमटी येथे प्रत्यक्ष पाहणीवेळी या खांबांवर स्केच पेनने गोलाकार आकृत्या, दिशादर्शक बाण, मानवाकृती चित्र, २०१० ते २०२५ अशा कालावधीच्या नोंदी, तसेच १००, २००, ५००, १००० कोटी असा उल्लेख केला होता. काही ठिकाणी ‘२४ तास सुरू’ असेही शब्दही आढळले. या सर्व लिखाणातून जणू काही विशिष्ट कल्पना किंवा कथानक मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ कुणाच्या वैयक्तिक विचित्र कृतीचे उदाहरण आहे, की काही वेगळा हेतू दडलेला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दररोज लाखो प्रवासी ये-जा करणाऱ्या या स्थानकात इतक्या वर्दळीच्या ठिकाणी, तेही मुख्य फलाटावर, खांबांवर तपशीलवार स्वरूपात लिखाण होणे आणि ते बराच काळ कोणाच्या नजरेत न येणे, ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

वारशाचे गंभीर नुकसान
ब्रिटिशकालीन वास्तुशैलीत उभारलेली ही ऐतिहासिक इमारत केवळ वाहतुकीचे केंद्र नसून, देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा संरचनेवर केलेले लिखाण हे केवळ सौंदर्य बिघडवणारे नसून, त्यातून वारशाचे नुकसानही होत आहे.

चौकशीची मागणी
या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित वारसा संरक्षण संस्थांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींना शोधून काढून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे.
....
स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन तो दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
.....
सीएसएमटी स्थानकातील खांबांवर काळ्या जादूशी संबंधित लिखाण आढळणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारांमुळे रेल्वेच्या सुरक्षेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण होते.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
.......
सीएसएमटीसारख्या जागतिक हेरिटेज स्थानकाचे असे विद्रूपीकरण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले; महिन्याभरात 23,000 रुपयांनी स्वस्त आणि आज तर तब्बल... खरेदीआधी जाणून घ्या ताजा भाव

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला प्रशासकीय मान्यता; 3 993 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

SCROLL FOR NEXT