पावसाळ्यापूर्वी पालिकेचा ‘अॅक्शन मोड’
आठ हजार आस्थापनांना नोटीस; ३३ हजार फांद्या छाटण्याचे आव्हान
मुंबई, ता. २७ : पावसाळा तोंडावर येत असताना महापालिका प्रशासनाने झाडांच्या फांद्या छाटणीसाठी कंबर कसली आहे. आपल्या परिसरातील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल सात हजार ९७८ खासगी व शासकीय आस्थापनांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये विशेषतः बोरिवली (आर सेंट्रल) आणि अंधेरी पश्चिम (के साऊथ) या विभागांत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या एकूण एक लाख ९० हजार २९६ झाडांपैकी ९२ हजार २७७ झाडांना फांद्या छाटणीची गरज असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. आतापर्यंत २६ हजार ६७२ झाडांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३३ हजार ४८ झाडांची छाटणी ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उद्यान विभागासमोर आहे. प्रशासकीय अहवालानुसार, सध्या मुंबईत १७ झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या झाडांबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ नालेसफाईच नव्हे, तर झाडांच्या छाटणीवरही पालिकेने विशेष भर दिला असून, ५९ हजार ७२० झाडांची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.
..
गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये आणि खासगी मालकांनी त्यांच्या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक,
विभाग नोटिसांची संख्या
आर सेंट्रल (बोरिवली) २,३१७
के साऊथ (अंधेरी पश्चिम) १,४९५
एम वार्ड (भांडुप) ६६९
आर साऊथ (कांदिवली) ४६०
आर नॉर्थ (दहिसर) ४३८
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.