मुंबई

महापालिकेची मैदाने होणार अतिक्रमण मुक्त

CD

महापालिकेची मैदाने होणार अतिक्रमणमुक्त
शिवशाही हटवणार झोपड्या; पात्र झोपडीधारकांना मिळणार घरे


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई शहरातील महापालिकेच्या मैदानांवरील अनधिकृत झोपड्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प हटवणार असून, त्याबाबतच्या सूचना एसआरए प्राधिकरणाने शिवशाहीला दिल्या आहेत. त्यानुसार शिवशाहीकडून संबंधित झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून पात्र रहिवाशांना प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या संक्रमण सदनिका (पीटीसी) मालकी तत्त्वावर दिल्या जाणार आहेत. त्या बदल्यात पालिकेकडून शिवशाहीला विकसित भूखंडाच्या २५ टक्के क्षेत्रफळाचे रेडिरेकनर दराने पैसे देण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत महापालिकेच्या अनेक मैदानांवर बेकायदा झोपड्या आहेत. त्या हटवण्याबाबत नुकतीच महापालिका आणि एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार एसआरएने या झोपड्या काढण्याची आणि त्यांची पात्रता निश्चित करण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली असल्याची माहिती शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लहूराज माळी यांनी दिली. तसेच अतिक्रमणाची माहिती एसआरएकडून दिली जाईल. दरम्यान, येथील पात्र रहिवाशांना शिवशाहीकडून प्रकल्प संक्रमण सदनिका दिल्या जाणार आहेत, तर अपात्र असलेल्यांवर थेट कारवाई करून मैदाने रिकामी केली जातील. त्यामुळे शिवशाहीला महसूल मिळणार असून पालिकेची मैदाने मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.

‘पीटीसी’साठी ४५ लाख रुपये
शिवशाहीकडून पात्र झोपडीधारकाला संक्रमण सदनिका मालकी तत्त्वावर दिली जाणार आहे. त्याची किंमत किंवा विकसित भूखंडाच्या २५ टक्के जागेची किंमत रेडिरेकनरच्या दराने पालिका शिवशाहीला चुकती करेल. त्यानुसार प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे ४५ लाख रुपये असेल. शिवशाहीकडे सध्या २७० पीटीसी असून, तीन हजार सदनिका वेगवेगळ्या विकसकांकडे आहेत. त्याशिवाय म्हाडासाठी ६७५, पालिकेसाठी ५८७ पीटीसी राखीव ठेवल्या असून, त्यांचाही वापर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

SCROLL FOR NEXT