मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
२६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी, १३ जूनपासून नियमित वर्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी पदवीच्या तीन आणि चारवर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या https://muugadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे.
बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाचवर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स) यासह अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
---------
नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) : ६ ते २१ मे (दुपारी १.०० पर्यंत)
- ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज सादर : ६ ते २१ मे
- पहिली गुणवत्ता यादी : २६ मे (सकाळी ११ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्कभरणा : २७ ते २९ मे (दुपारी ३ पर्यंत)
- दुसरी गुणवत्ता यादी : ३० मे (संध्या ७ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्कभरणा : १ ते ३ जून (दुपारी ३ पर्यंत)
- तिसरी गुणवत्ता यादी : ४ जून (संध्या ७ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्कभरणा : ५ ते ९ जून
- अभ्यासक्रमास सुरुवात : १३ जून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.