मिरज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मिरजेत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, माजी आमदार किरण पावसकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला, तर मंत्री संजय शिरसाठ, माजी आमदार किरण पावसकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला.