मुंबई

‘विज्ञान वारी’ उपक्रमाला मान्यता

CD

विद्यार्थ्यांना इस्रोसह नासाला भेटीची संधी
‘विज्ञान वारी’ उपक्रमाला मान्यता

मुंबई, ता. ६ : राज्यातील सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यातल्या ३५८ तालुका स्तरावरील प्रत्येकी सहा अशा एकण २,१४८ विद्यार्थ्यांना मुंबई, नागपूर आणि पुण्यातील विभागीय सायन्स सेंटरला आणि जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बंगळूर येथील इस्रो आणि राज्य स्तरावर निवड झालेल्या ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथील केंद्राला भेटीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाला मान्यता देण्याचा आदेश आज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
...
वैशिष्ट्ये अशी
- तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या एकूण २,१४८ विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देण्यात येईल.
- जिल्हा स्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बगळूर येथील इस्रो केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
- राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येणार आहे.
- उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार असून, संबंधित स्तरांवरील अधिकाऱ्यांवर नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
...
नासासाठी अशी होईल निवड
गट----------------------------- विद्यार्थ्यांची संख्या
प्राथमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) १७
प्राथमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) ४
प्राथमिक विद्यार्थी गट (आदिवासी) ४
माध्यमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) १८
माध्यमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) ४
माध्यमिक विद्यार्थी गट (आदिवासी) ४
एकूण ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT